लोटे :- खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र असगणी येथील स्वयंभू पांडवकालीन महादेव मंदिरात दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन प्राथमिक विद्यामंदिर, घाणेकुंट-लोटे या शाळेची वर्षा सहल काल दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात दाखल झाली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्री महादेवाचे दर्शन घेऊन निसर्गरम्य वातावरणात सहलीचा आनंद घेतला. नूतन प्राथमिक विद्यामंदिराची शाळा गेल्या सलग तीन वर्षांपासून श्रावण महिन्यात सहलीदरम्यान श्री. स्वयंभू पांडवकालीन महादेव मंदिराला भेट देत आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मंदिर व्यवस्थापक कमिटीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी मंदिर व्यवस्थापक श्री. संदीप हरी फडकले (माजी खेड तालुका अध्यक्ष, मनसे)तसेच त्यांचे सहकारी आणि असगणी ग्रामस्थ:श्रीकांत फडकले(भैरी देव प्रतिष्टान अध्यक्ष ), अजय शिगवण, नवनाथ मायनाक, सुजल फडकले, अनिश शिगवण, विवेक नायनाक, अनिल गीते, रुपेश गोसावी, चैतन्य कुळे यांच्यासह शाळेचे शिक्षकवर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या वार्षिक सहलीचे मंदिर व्यवस्थापन कमिटी व ग्रामस्थांनी मनापासून स्वागत करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.