चिपळूण : न्यायालयाचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील कार्यक्रम चिपळूण शहरातील शिक्षक पतपेढीच्या सभागृहामध्ये पार पडला. संविधान प्रस्ताविकेचे पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव होते. या कार्यक्रमाला उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती हितेन एस वेणेगावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रत्नागिरी विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चिपळूण न्यायाधीश गौतम दिवाण, चिपळूणचे न्यायाधीश, वकील संघ चिपळूणचे अध्यक्ष नितीन सावंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. नितीन सावंत यांनी करताना हे न्यायालय सुरू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला रत्नागिरी येथून ॲड. पाटणे, चिपळूण न्यायालयातील सर्व न्यायाधीश वर्ग, वकील आणि शहरातील नागरिक सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. नयना पवार यांनी केले