चिपळूण : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मृद संधारण व जलसंधारण विभागाच्या आदेशा नुसार महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या जन्म दिनी २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला. अर्थ फाउंडेशनच्या वतीने महविद्यालयात चर्चा सत्र व मार्गदर्शन करण्यात आले. आला जलदूत व अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शाहनवाज शाह यांनी या वेळी या दिनाचे महत्व, यांनी पाण्याचे महत्व, पाण्याचा उपलब्ध साठा, पाण्याचे उपयोजन याबद्दल माहिती दिली. तसेच नवीन पिढीचे निसर्ग आणि पर्यावरणीय दृष्ट्या काम करून माती व जलसंधारणाचे महत्व पटवून दिले. तसेच या विद्यर्थ्यांनी या वर्षी जलसंधारणाचे काम हाती घ्यावे व त्याचा अहवाल आपल्या विद्यालयाला सादर करावा पहिले तीन चांगले काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्थ फाउंडेशनचे वतीने सन्मान करून पारितोषिक देण्यात येईल असे सांगितले. या वेळी डी बि जे महाविद्यालयाचे शेती विभागाचे प्राध्यापक योगेश आगवेकर यांनी पी.पी.टी प्रेझेंटेशन द्वारे मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी एल.बी.एस म्हणजे काय ?तसेच एल.बी.एस चा वापर आपण कसा करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. प्राध्यापक पियुशा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले शेवटी जलसंधारणाची प्रतिज्ञा करण्यात आली.
या वेळी अर्थ फाउंडेशनचे पर्यावरण प्रेमी समीर कोवळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या अरुणा सोमण, तसेच प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते
श्री आनंदराव पवार महाविद्यालयात जलसंधारण दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे धडे
