रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्या सह संपूर्ण महाराष्ट्रात समाईक जमिनी मोठ्या प्रमाणात असून काही जमिनित आणेवारी ही लागली आहे . खुप मोठ्या प्रमाणावर जमिनिची आणेवारी लागली असली तरी शासन निर्णया प्रमाणे वहिवाटाचे क्षेत्र वहिवाटदाराचे नावाने पिकपाणी लागत नाही त्यामुळे बागाईत तसेच पिकाचे नुकसान भरपाई कसवणूक दाराला मिळत नाही त्यामुळे शासन निर्णयाचा लाभ वहिवाटदाराला मिळत नसलेने तसेच प्रत्येक क्षेत्राला संगणक नोंदणी करताना ओटीपी येत नाही त्यामुळे पिकपाणी लावताना, नुकसान भरपाईची रक्कम ही मिळणेस अडचणी येत आहेत . या साठी स्थानिक महसूल व शेती विभागाकडे दाद मागितली तर आम्हाला वरिष्टां कडून कोणतेही पत्रक नाही अगर जी आर नाही असे सांगितले जाते . त्यामुळे शासनाने जरी समाईक जमिन असली आणि आणेवारी लागलेली असली व आणेवारी मध्ये ही असलेल्या हिस्सेदारांना त्यांच्या वहिवाटीच्या क्षेत्राची पीकपाणी आणि नुकसान भरपाई त्याच्या एकून जमिनीपैकी जितके क्षेत्र येते त्या वर स्वतंत्रपणे द्यावी नाहितर वहिवाटीस असलेल्या कसवणूक दारावर अन्याय होत आहे असे मत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि संस्थापक अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोकराव जाधव यानी मांडले .
या बाबत अशोकराव जाधव यानी रत्नागिरी निवासी जिल्हा अधिकारी मा . सुर्यवंशी यांचेशी चर्चा केली असता चर्चामध्ये अशोकराव जाधवांचे मताशी सहमती दर्शवून सदर बाबतीत सर्व तहसिलदारांना सुचना देणेत येतील असे सांगितले व वहिवाटी प्रमाणे नोंदी बाबत येणाऱ्या समस्या बाबत वरिष्टांना कळवून आदेश घेण्याचा प्रयत्न निश्चित करू अशी हमी दिली .
यासाठी अशोकराव जाधव यानी काँग्रेसच्या वतिने सर्व शेतकरी – कष्टकरी जनतेला आवहान केले आहे की प्रत्येक हिस्सेदाराने वहिवाटाने योग्य असलेल्या क्षेत्रावर पिक पाणी लावण्याचा आग्रह तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार तसेच कृषी विभागाचे पर्यवेक्षप, तालुका कृषी अधिकारी यांचे कडे करावा .व या बाबत सर्व शेतकऱ्यांच्या वतिने लवकरच महसुल विभाग व कृषी विभागाला तालुका वार निवेदण देण्यात येणार असलेचे अशोकराव जाधव यानी काँग्रेसच्या आणि शेतकरी – कष्टकरी संघटनेच्या वतिने जाहिर केले आहे .

आपले – महादेव चव्हाण ,विश्वनाथ किल्लेदार, जितेंद्र आंब्रे ‘ बशिर मुजावर, संतोष मांढरे, मंगेश मोरे, लक्ष्मीकांत मयेकर, भाई चौगुले,बंडू शेठ जाधव , दिलीप जाधव, अविनाश जाधव, फारूख मुकादम, अनंत धामणे, देवेंद्र पाटील, अनामिका जाधव, सिध्देश मराठे, अल्पेश मोरे , चंद्रकान्त परवडी, पांडूरंग रहाटे .