मुंबई : मुंबईत सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक गणेशमूर्ती आणि देखावे साकारले जातात. यंदा मात्र एका अनोख्या आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबईतील कलाकारांनी चक्क टिशू पेपर आणि कागदाच्या लगद्याचा वापर करून तब्बल दहा फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती साकारली आहे. हजारो टिशू पेपर्सचा वापर करून ही देखणी कलाकृती तयार करण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणाऱ्या या अनोख्या बाप्पाची सध्या मुंबईत चांगलीच चर्चा रंगली आहे.