मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता येताच पहिल्या १०० दिवसांमध्ये तब्बल २३ मोठे निर्णय घेऊन मुंबईकरांना भ्रष्टाचार विरहीत कारभाराची झलक दाखवून दिली असून तब्बल २५ वर्षानंतर महानगरपालिकेत सुशासन अवतरले आहे, असा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केला.
भाजपा, शिवसेना आणि रिपाइं महायुतीच्या मुंबई महापालिकेतील पहिल्या १०० दिवसांतील कामगिरीचा लेखाजोखा आमदार अमीत साटम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी आमदार साटम यांनी २३ निर्णयाची यादी दिली. पत्रकार परिषदेला महापाैर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले व इतर समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.मराठी भाषेच्या प्रसारासाठी तसेच पालिका शाळांमध्ये एआय आणि रोबोटीक लॅब्जसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. झोपडपट्टीच्या दत्तक वस्ती याेजनेत अमूलाग्र बदल प्रस्तावित असून भायखळा प्राणिसंग्रहालयासाठी गुजरातकडून दोन आशियाई सिंहाची मागणी करण्यात आल्याची आली आहे. तसेच पुढच्या काळातही महायुतीचा मुंबई महापलिकेतील कारभार भ्रष्टाचार विरहीत पारदर्शक राहील, असा राहील असा निर्धार आमदार साटम यांनी व्यक्त केला.