मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम व सौ. श्रेया कदम यांच्या सौजन्याने शिवसेना महिला आघाडी व युवती सेना मंडणगड तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नारी शक्तीचा जागर’ मंगळागौर स्पर्धेत भिंगळोली येथील आनंदी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा २२ ऑगस्ट २०२६ रोजी भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण १५ महिला संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आनंदी ग्रुप भिंगळोलीला २० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाच्या मंगल सखी परिवाराला १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकाच्या आई सोमजाई ग्रुप सुर्ले यांना १० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व संघांचाही सौ. श्रेया कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अस्मिता केंद्रे, सौ. अमिता शिंदे, पंचायत समिती सभापती सौ. प्रणाली चिले, ज्येष्ठ शिवसैनिक सौ. शिला शिंदे, पंचायत समिती सदस्य सौ. दीप्ती घडशी, उपतालुका संघटिका सौ. सुप्रिया धोंडगे, विभाग संघटक सौ. भाविका बोबले, सौ. मयुरी सावंत, सौ. आशा सोंडकर, उपविभाग संघटक सौ. ज्योती जगताप, सौ. अलका जाधव, सौ. सुप्रिया माळी, सौ. रसिला दुर्गवले, महिला शहर संघटक तथा नगरसेविका सौ. सेजल गोवळे, उपशहर संघटक तथा नगरसेविका सौ. नम्रता पिंपळे, नगरसेविका सौ. वैशाली रेगे, नगरसेविका तथा युवतीसेना तालुकाधिकारी सौ. प्रमिला किंजळे, युवतीसेना शहर संघटक सौ. संपदा भगत, सरपंच सौ. प्रमिला दळवी, सौ. अंजली घागरूम, सौ. अनुष्का पिचुर्ले, सौ. संजना राणे तसेच महिला ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, तालुका संघटक अनंत लाखण, उपसभापती तथा विभागप्रमुख दीपक मालुसरे, पंचायत समिती गटनेते अनिल रटाटे, विभागप्रमुख इरफान बुरोंडकर, संजय शेडगे, उपविभागप्रमुख भूपेंद्र बोर्ले, शहरप्रमुख तथा नगरसेवक विनोद जाधव, उपशहरप्रमुख निलेश गोवळे, सचिव सिद्धेश देशपांडे, युवासेना तालुकाध्यक्ष विकास पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना कायदेविभाग जिल्हा सचिव कल्पेश शिंदे यांनी केले.
‘नारी शक्तीचा जागर’ मंगळागौर स्पर्धेत आनंदी ग्रुप भिंगळोली प्रथममंगल सखी परिवार द्वितीय, तर आई सोमजाई ग्रुप सुर्ले तृतीय
