खेड : खेडमध्ये वाढत्या चारचाकी आणि दुचाकींची वाढती संख्या लक्षात घेता,  पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येची यामध्ये भर पडत असल्याने, त्यातच खेड  ते भरणा नाका मार्गावरील छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते पंचायत समितीच्या कार्यालयापर्यंत रस्त्याच्या कडेला दुकांनासमोरच. आणि खेड  बस स्थानक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत अरुंद  रस्त्यावर वहातूकीच्या कोंडीचा समस्या उभी राहीली असुन, वहातुकीच्या कोंडीचा सर्वाधिक फटका मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला आणि रुग्णवाहीकेला बसत आहे.  वहातूकीच्या कोंडीवर एकमेव पर्याय म्हणजेच रस्त्याचे रुंदीकरण करणे होय, तरच वहातूकीच्या कोंडीचा भिषण समस्या मार्गी लागणार आहे.               

आता प्रशासनाने अनधिकृत खोकेधारकांना/ मालकांना  नोटीसा देऊन आपले बांधकाम आपणच हटवावे अशाप्रकारची नोटीस बजावली असून, आपण आपली अनधिकृत खोके न हटविल्यास प्रशासन  अनधिकृत खोके हटविण्याची भुमिका चोखपणे बजावणार असल्याचे खात्रीलायक माहीती आहे. मात्र काहीही असो शहराच्या विकासाला चालना मिळण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण होणे ही काळाची गरज आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या बाबतीत प्रशासन कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

प्रशासनाने स्वरुपनगर पासुन रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली असून रुंदीकरणाच्या कामाला पंचायत समितीच्या कार्यालयापर्यंत चालना मिळायला काहीच हरकत नाही. त्यामुळे प्रशासनाने झपाट्याने रस्त्याच्या रुंदीकरणाचे झपाट्याने आटपुन घ्यावे जेणेकरून वहातूकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत वहातूकीची कोंडी निर्माण झाल्यास दुचाकीस्वार चुकीच्या बाजुने वाहन नेणे (ओव्हर टेक करणे) रस्ता ओलांडून मार्गस्थ होत असल्याने आणि रस्त्याच्या कडेलाच वाहन उभी असल्यान अपघातास आमंत्रण मिळत आहे. अपघातातून वाहनाचे नुकसान तर होणारच आहे, शिवाय वाहन चालक दुखापतग्रस्त होऊन जायबंदी होत आहेत.  ही भितीच आहे. म्हणूनच वहातूकीची कोंडी, चुकीच्या बाजुने ओव्हर टेक आणि वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता, अपघात होऊ नये, यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करणे याशिवाय तरणोपाय नाही.