चिपळूण : गोवळकोट येथे भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेली घरगुती गणपती डेकोरेशन स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. भाजपा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संमतीने युवा जिल्हा उपाध्यक्ष निखिल किल्लेकर यांनी गोवळकोट गाव मर्यादित या विशेष स्पर्धेची घोषणा केली होती. या घोषणेनंतर गावातील अनेक भाविकांनी आणि स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
स्पर्धेच्या परीक्षणासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोवळकोट गावामध्ये फिरून गणेश दर्शन घेतले आणि सजावटीची प्रत्यक्ष पाहणी केली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेचे अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आले असून विजेते खालीलप्रमाणे आहेत:
प्रथम तीन विजेते:
अक्षय रामचंद्र आग्रे
प्रमोद गोरीवले
ऋषिकेश हरवडे
उत्तेजनार्थ पारितोषिके:
सतीश चांदवडे
साहील गिजे
गणेश खोपडकर
तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धाकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यासाठी श्री. प्रशांत यादव जिलाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये शहराध्यक्ष तथा गटनेते शशिकांत मोदी, महिला बालकल्याण सभापती रसिकाताई देवळेकर, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, आशीष खातू,नगरसेविका वैशालीताई निमकर, तुषार रेडीज,तुषार बेचावडे,संतोष शिंदे, संदीप आग्रे, विक्रांत महाकाल, चव्हाण साहेब आणि पठाण साहेब, बेलवालकर साहेब यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा जिल्हा उपाध्यक्ष निखील किल्लेकर, चिपळूण नगर परिषद वृक्ष संवर्धन समिती सदस्य विनायक भैरवकर, प्रतीक गोरीवले,विजय खापारे,बाबु महाकाल प्रशांत पोतदार,राजु शिंदे,अमोल भागड़े,आणि सर्व भाजप गोवळकोट कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
