मुंबई : १० ऑक्टोबर रोजी, नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर CJP आणि काँग्रेसच्या वतीने एक जनप्रदर्शन केले जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी ही या प्रदर्शनाची मुख्य मागणी आहे. ही मागणी मतदार यादीतील बदल आणि SIR दरम्यान मतांमध्ये फेरफार झाल्याच्या आरोपांवरून केली जात आहे. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्याच्या या जनप्रदर्शनाला पाठिंबा देते.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, सरकारकडून हे प्रदर्शन ‘दाबण्याचा’ प्रयत्न केला जात आहे. भाजप सरकारने आधीच दिल्लीला जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. दुसरीकडे, आरएसएस गृह मंत्रालयाच्या पाठिंब्याने हिंदुत्ववादी गुंडांना आंदोलकांच्या वेशात उद्याच्या जनप्रदर्शनात समाविष्ट करण्याची तयारी करत आहे, जेणेकरून हिंसाचार भडकवता येईल आणि पोलिसांशी संघर्ष निर्माण करता येईल. असे करून पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर निर्दयीपणे लाठीचार्ज व्हावा, ज्यामुळे संपूर्ण देशात तणाव आणि अशांतता पसरावी, अशी त्यांची इच्छा आहे. उद्या जर कोणाचा जीव गेला किंवा कोणी जखमी झाले, तर त्याला दिल्ली पोलिस पूर्णपणे जबाबदार असतील.

तसेच, ॲड. आंबेडकरांनी याची दुसरी महत्वाची बाजू सुद्धा मांडली आहे. ज्याप्रमाणे सरकार उद्याचे प्रदर्शन दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचप्रमाणे CJP आणि काँग्रेसदेखील ‘दाबण्याचे’ राजकारण करत आहेत. दोघांनीही दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजातील नेत्यांना या प्रदर्शनापासून दूर ठेवले आहे आणि त्यांना निमंत्रित केलेले नाही.

एम. के. स्टॅलिन, बीआरएस पक्ष, मायावती, राजकुमार रोत यांना का निमंत्रित केले गेले नाही? एकिकडे सरकार प्रदर्शन दाबण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे प्रदर्शनाचे नेतृत्व करणारे पक्ष दलित, आदिवासी आणि ओबीसी नेतृत्वाला दाबत असल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.

आमचा पाठिंबा आंदोलनाला आहे, परंतु लोकशाहीच्या लढ्यात सर्वांचा सहभाग असणेही गरजेचे आहे.
मी पुन्हा एकदा सांगतो की, वंचित बहुजन आघाडी , १० ऑक्टोबरच्या जंतर-मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देते. असा पुनोरुल्लेख त्यांनी केला.