ठाणे : दिव्यांग कला केंद्रात विशेष मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष होळी आणि रंगपंचमी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. दिव्यांग मुलांच्या आनंदासाठी तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या षडरिपूंचे दहन व्हावे, या भावनेतून होलिकामातेची प्रार्थना करण्यात आली.

या उपक्रमातून पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून एकमेकांना रंग लावण्याचा संदेशही देण्यात आला. समाजात सकारात्मकता, स्नेह आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार रुजविण्याचे कार्य दिव्यांग कला केंद्राच्या या विशेष होळीच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. या उपक्रमासाठी संचालक किरण विष्णू नाकती आणि संचालिका संध्या किरण नाकती यांनी पुढाकार घेतला आहे.

यंदाही विशेष मुलांच्या मनसोक्त आनंदासाठी या होळी आणि रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमच्यासाठी खरा उत्सव असल्याचे संचालिका संध्या किरण नाकती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

या प्रसंगी दिव्यांग कला केंद्रातील विशेष मुलांनीही आपल्या भावना व्यक्त करत उत्सवाचा मनापासून आनंद लुटला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH