मुंबई:- तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता अशी टीका त्यांनी केली आहे.
रोहिणी खडसे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत की, आता क्षणाला मी ही पोस्ट करत असताना विधिमंडळात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री, तज्ज्ञ मंडळी यावर भाषणं ठोकतील आणि दुसरीकडे सरकारने आतापर्यंत तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे ? असा सवाल करत असतानाच त्या म्हणाल्या की,
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा परिस्थिती काय होती ?
सुरुवातीचे लाभार्थी : २.५३ कोटी
सुरुवातीचे बजेट: ४५,००० कोटी रुपये
तपासणीनंतर संभाव्य पात्र लाभार्थी: १,४८,६०,०००
२०२६-२७ बजेटमध्ये तरतूद : २६,५०० कोटी
संभाव्य अपात्र महिला सुमारे: १.०५ कोटी
म्हणजे निवडणूक होती तेव्हा शासनाने सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले. निवडणुका जिंकल्या तर हळूहळू लाडक्या बहिणींवरचे प्रेम कमी होऊ लागले.
