नवी दिल्ली : राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा आणि पोलिसांचा काहीही संबंध नाही. पोलिसांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती त्यांची ही ताकद आहे. त्या शक्तीने पोलिसांना हे करायला लावले, पोलिस स्वतःहून असे काही करणार नाही. ही जी घटना घडली आहे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, मी मुख्यमंत्र्यांना याबद्दलचे पत्र लिहिणार आहे. काल मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत चर्चा केली. कारण दिल्लीतील वर्मतमान पत्रांमध्ये काही बातम्या आल्या आहेत. पण महाराष्ट्रासाठी हे दुर्देव आहे, जी काही साताऱ्याची घटना झाली. लोकशाहीची हत्या आहे. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालणार. हा पोलिसांचा संबंध नाही. त्याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या मागे जी शक्ती होती ती त्या अदूश्यशक्तीचा ताकद आहे. हे पोलिसांना करायला लावले नाही तर महाराष्ट्रातील पोलिस असे करणारच नाहीत, असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, हा मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असा विषयच नाहीये. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत अशी गुंडागर्दी होणार असेल तर त्याच्यापुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय आहे. उद्या परत 10 ठिकाणी होईल, मुळात म्हणजे असे करणेच चुकीचे आहे. मी शंभूराजेंनाही फोन करणार आहे आणि मी मकरंद पाटलांना फोन करून अगोदरच सर्व माहिती घेतली आहे. असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,शंभूराजे देसाई आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली असेल तर याची चाैकशी व्हायला पाहिजे, दोघेही कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करतंय. पाडुरंगा काय दिवस बघायला मिळत आहेत, महाराष्ट्रामध्ये. तेही मित्र पक्षांनाच ते त्यांचे मित्र पक्षच आहेत ना? असेही सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,साताऱ्यातील प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांना भाजपाच्या मंत्र्यांकडून थेट रस्त्यावर मारहाण करण्यात आली. काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार यादरम्यान आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. शंभुराज देसाई काल विधीमंडळात जे बोलले ते धक्कादायक होते, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,जर मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांना जर धक्काबुक्की झाली असेल तर ते दोघेही कॅबिनेट मंत्री आहेत. याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. एकतर ते सरकारचे भाग आहेत. ज्या सरकारचा तुम्ही भाग आहात तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करत आहे. हे पांडुरंगा काय दिवस बघायला लागतायत महाराष्ट्रात. धाकट्या भावालाच अशी धक्काबुक्की होत असेल तर आपल्याला सर्वांनाच आत्मचिंतन करण्याची गरज आहे ,असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, एका कॅबिनेट मंत्र्याला मारहाण कशी होते? या घटनेचा निषेधच आहे. कोणाच्याही मनमर्जीने हा देश चालणार नाही. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालणार. हा पोलिसांचा संबंध नाही. त्याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या मागे जी शक्ती होती ती त्या अदूश्यशक्तीचा ताकद आहे. हे पोलिसांना करायला लावले नाही तर महाराष्ट्रातील पोलिस असे करणारच नाहीत, असा माझा विश्वास आहे. असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
