चिपळूण : रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन रत्नागिरी पर्यावरण विभाग जिल्ह्याच्या वतीने तालुक्यातील ओझरवाडी येथील निसर्गाच्या सानिध्यात वसले भगवान शंकराचे मंदिर परिसरात बुधवार दि. 1 एप्रिल रोजी वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या मंदिराची स्थापना सुमारे 50 वर्षांपूव कै . कॅप्टन तातोजी धोंडू जाधव आणि त्यांचे दोन बंधु कै. प्रभाकर धोंडु जाधव, व कै. भाऊ धोंडू जाधव या भावंडांनी स्वखर्चाने मिळुन या मंदिर बांधुन येथे भगवान शिव शंकराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या सभोवताली शांत वातावरण असून मंदिराच्या आजूबाजूला मानवी वस्ती आहे.
स्वरा जाधव यांनी या मंदिराची माहिती दिली. त्यानूसार तेथे रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन पर्यावरण विभाग रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यात काजु, फणस, सुपारी, वड, जास्वंद, सिताफळ, खजुर, अशी अनेक फळ आणि फुल झाडे मंदिराच्या सभोवताली लावली आहेत.
वृक्षारोपण करण्यासाठी स्थानिक महिला लहान मुलांनी खुप मदत आनंदाने उत्साहाने सर्वजणींनी मिळुन वृक्षारोपण केले. तसेच तेथील सर्वांनी झाडांची आम्ही चांगली काळजी घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन रत्नागिरी पर्यावरण जिल्हा अध्यक्ष वर्षा खटके पाटील, चिपळूण तालुका पर्यावरण अध्यक्ष अपुर्वा गायकवाड, स्वरा जाधव, सोनाली राणे, सुलोचना निकम, वैशाली जाधव, ज्योती जाधव, शुभांगी कदम, मंगल नवरत आदींची उपस्थिती होती.