पोलादपूर (शैलेश पालकर ) : मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ग्राउंड वर झालेल्या म्युझिक कन्सर्ट दरम्यान दोन युवकांचा ड्रग्स च्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आयुष विकी साहित्य हा उल्हासनगर मधील आरोपी फरार झाला होता.
रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदरावडे यांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गोवा येथे कारने जाताना आयुष साहित्य याच्यावर झडप घालून पकडण्यात आले.
गोरेगाव येथील म्युझिक कन्सर्टच्या नावाखाली आयोजित रेव पार्टीमध्ये ड्रग चे अति सेवन करणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी. वनराई पोलिस ठाणे मुंबई शहर येथे भारतीय न्याय संहिता आणि NDPS कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
