मुंबई : पाहलगाम हल्ल्याला एक वर्ष उलटूनही केंद्रातील भाजप सरकारला हल्लेखोरांना न्यायालयासमोर उभे करण्यात यश आले नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत तपासे यांनी पाहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळण्याच्या स्थितीबाबत केंद्र सरकारला जाब विचारला. महेश तपासे यांनी प्रधानमंत्री मोदी यांना विचारले, “पाहलगाम हल्ल्याचा सूत्रधार साजिद जाट याला फाशी कधी देणार?”
यासोबतच त्यांनी असा सवालही उपस्थित केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या अलीकडील ४० मिनिटांच्या दूरध्वनी संभाषणाचा उपयोग पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणण्यासाठी का केला नाही, जेणेकरून जाटचे भारतात प्रत्यार्पण होऊ शकेल?