मुंबई : राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यात अडथळा ठरणाऱ्या आधार पडताळणी प्रक्रियेची तातडीने पूर्तता करून या वृद्ध कलावंतांचे मानधन तत्काल मिळायला पाहिजे. तसेच निष्क्रिय असलेले ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ त्वरीत कार्यान्वित करावीत, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्य आणि इलेक्ट्रानिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

मुंबई उपनगरात आधार सेवांची वाढती मागणी लक्षात घेता उपलब्ध जागेअभावी निर्माण होणाऱ्या अडचणींचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे महापालिका शाळा व महाविद्यालयांमध्ये आधार केंद्रे सुरू करण्याचा पर्याय विचाराधीन ठेवण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना दिले.