जळगाव:- वाढत्या उष्णतेमुळे राज्यात अनेक जणांचा मृत्यू होत आहे. उन्हाचा तडाखा काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे. एसीत बसून ऐटीत राहणाऱ्यांना सामान्य माणसांचा हा त्रास कळणार का ? अजून किती मृत्यूची नोंदी शासनाला पाहिजे ? असा सवाल त्यांनी केला आहे.
विकासाच्या नावाखाली जंगलं तोडली जात आहे, कांदळवनांची नासधूस केली जात आहे, मागे स्वतःला कट्टर हिंदू म्हणवून घेणारे आपल्या राज्यातील राज्यकर्ते तर नाशिकमधील तपोवन तोडायला निघाले होते. तिथे प्रभू श्रीरामांनी निवास केला होता. या पुढे असा निर्णय घेताना जरा डोकं चालवा !
