सांगली : आमच्या अंगात शिवाजी महाराजांसह अनेक थोर महापुरुष येत असल्याचा बनाव करत एका कुटुंबाला नरबाळी व गर्भपातचा सल्ला देऊन शारीरिक व आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या विटा येथे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये तिघा भोंदू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, विटा येथील कडेश्वर धाम आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून तिघा भोंदूंकडून एका महिलेला तिच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी नरबळी व गर्भपात करण्याचा धक्कादायक सल्ला देत शारीरिक व आर्थिक फसवणूक करण्यात आली, तसेच अघोरी उपचाराच्या नावाखाली पीडित महिलेच्या पतीला काठीने मारहाण देखील करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीनंतर विटा पोलिसांकडून महेश बाबर, संकेत निकम आणि सुरज उपाध्याय या तिघां विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.