मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची नुकतीच बांद्रा येथील संविधान निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजनांसह विविध विषयांवर मल्हार पाटेकर यांनी ना. रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली. मल्हार पाटेकर हे चित्रपट निर्माते म्हणून चांगले कार्य करीत आहेत.