मोहोपाडा : विजवितरण कार्यालयाकडून मान्सून पुर्व कामे गेल्या काही दिवस सुरु असून वृक्ष फांदी छाटणी, रिजम्परिंग,उच्च दाब वाहिनीची दुरुस्ती आणि इतर मेंटेनन्सची सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. विज वितरणाचे अधिक्षक अभियंता बिक्कड साहेब, कार्यकारी अभियंता शिंदे साहेब,उपकार्यकारी अधिकारी राख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा विज वितरणाचे उपअभियंता लक्ष्मीकांत लालासाहेब गलांडे पाटील यांच्यावतीने मोहोपाडा परिसरात सुरू आहेत.मोहोपाडासह आसपासच्या परिसरातील फांदी छाटणी, उच्च दाब वाहिनी बदलणे आदी कामे सुरू आहेत.
दरम्यान मोहोपाडा परिसरात नविन ट्रान्स्फार्मं व डिपी बसविण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली.तसेच श्री गणपती मंदिरामागील परिसरात नव्याने दोन विजपोल बसविण्याचे काम सुरू करण्यात आले.तसेच मोहोपाडा प्रवेशद्वाराजवळील झुकलेला पोल काढणार असून त्याजागी नवीन विजपोल बसविण्यात येत आहे.यावेळी मोहोपाडा विजवितरणाचे उप अभियंता लक्ष्मीकांत गलांडे, लाईनमन शिंदे, पत्रकार, समाजसेवक तथा मागणीकर्ता राकेश खराडे, व्यापारी असोसिएशनचे प्रदिप पाटील,अमित शहा आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. मोहोपाडा परिसरातील विजपुरवठा कायमचा सुरळीत करण्यासाठी विजवितरणाचे काम सुरू असून आठवडाभरात काम पूर्ण होणार असल्याचे उप अभियंता लक्ष्मीकांत गलांडे यांनी बोलताना सांगितले.