खेड (प्रतिनिधी) : – शहराजवळील भरणेनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तसेच भरणे उड्डाणपूल तळीरामांचा अड्डा बनला आहे. याठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. याविरोधात खेड पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेतर्फे खेड पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनानुसार, भरणे नाका येथे महामार्गावर तळीरामांनी परिसर दूषित केला आहे. भरणे उड्डाणपूलावर तळीरामांचा अड्डा होत असल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.भरणानाका येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरील उड्डाणपुलावर नुकताच हा निंदनीय प्रकार घडला आहे. अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर असे कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीस सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश निकम, सचिन खेडेकर, खेड तालुका सचिव वैभव सागवेकर, उपतालुकाध्यक्ष कुणाल कडू, रुपेश निकम, साईनाथ निर्मल, आदित्य पवार, परेश गमावल आदी उपस्थित होते.