चिपळूण : सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी विरेश्वर तलावातील वाढलेली झाडे-झुडपे काढण्याची मागणी दैनिक सागरमधून केली होती. नित्यानंद भागवत यांच्या मागणीची दखल घेत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने विरेश्वर तलावाची नुकतीच साफसफाई केली.

तलाव परिसरातील झाडे-झुडपे साफ करण्यात आली. तसेच तलावाच्या पाण्यातील प्लास्टिकच्या बाटल्या व खाद्यपदार्थांच्या वेष्टनांचे कागदही बाहेर काढण्यात आले. याशिवाय तलावाच्या पाण्यात तरंगत असलेले मृत मासेदेखील काढण्यात आले.

तलावातील मासे का मृत्यूमुखी पडले, याचा शोध नगर परिषद घेत आहे.