लांजा : केंद्रशासनाने, महाराष्ट्र शासनाने गोरगरीबांना धान्य अगदी मोफत दिले तरी पुरेसे नाही. आमची जमीन जागा आहे व शेतकरी आहोत असे असताना आम्ही जमीन पड ठेवणार नाही शेती करणे हा आमचा हक्क आहे.आमचे वाडील शेती करत आले.तो वारसा आम्ही जपणार.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आळसी करून ठेवलं मोफत धान्य देत आहेत.म्हणून लोक शेती करत नाहीत कोकणात पुर्वी भात,नाचना,बरग,हरीख,वरी,तिळ,सर्व्हट भात,असी वेगवेगळी शेती करत होते.महागाई मुळे शेतमजूर पैरीमाणसे मिळत नाहीत.व विकत शेतमजूर परवडत नाही.म्हणून शेतीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.ज्याच्या घरी स्वतःची माणसे अहतील तर त्यांनी करायला जड वाटत नाही.
लांजा आगरवाडी येथील बापेरकर कुटुंब यांनी शेती जोपासली आहे सदर फोटो मध्ये नाचना शेती लावताना दिसत आहेत.नाचन्याची शेती करताना प्रथम मशागत करायला हवी पाऊस पडला की नाचणीची पेरणी करण्यापुर्वी जोतानी नांगरणी करणे नंतर नाचणे पेरणे.ज्याठिकाणी नाचण्याची रोपे लावणार त्या ठिकाणी उखल बेर तिनचार वेळा करवी लागते.इरफल काढणे,रोंबे काढणे त्या काढलेल्या रोंब्यात खत राखाडी वाढणे नंतर नाचणी रोपे लावण्यात येतात.
शासनाने धान्य मोफत दिले तरी आम्ही शेतीकरणार:बापेरकर…
