पनवेल : विमा पॉलिसीचा फायदा मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर टोळीने पनवेलमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तीकडून तब्बल १ कोटी ३३ लाख ५८ हजार ९४१ रुपये उकळले. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र (५८, रा.पनवेल) हे व्यवसायाने अकाऊंटंट असून आजारपणामुळे ते मागील वर्षभरापासून घरीच आहेत. सायबरचोराने डिसेंबर, २०२५मध्ये पियुष सोमाणी नावाने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांची विमा पॉलिसीची मुदतपूर्ती झाल्याचे सांगितले. तसेच शेवटचा हप्ता भरल्यास त्यांना मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. पाटील यांनी आधी काही रक्कम भरली. त्यानंतर सायबर टोळीने त्यांना पॉलिसी बंद होण्याची भीती दाखवली. तर कधी २२ लाख रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवले. पैसे भरल्यानंतर सायबर टोळीने रवी कपूर नावाची व्यक्ती असल्याचे भासवून त्यांना बनावट पावत्या पाठवल्या. बँकेच्या एका जुन्या कर्मचाऱ्यानेही पावत्या खऱ्या असल्याचे सांगितल्याने पाटील यांचा विश्वास बसला. त्यानंतर सायबर टोळीने संगनमत करून पाटील यांना वेळोवेळी पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक अशा विविध खात्यांत तब्बल १ कोटी ३३ लाख ५८ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र सायबर टोळीने पुन्हा ३३ लाख रुपये भरण्यास सांगितले. इतकी मोठी रक्कम भरल्यानंतर शंका आल्याने पाटील यांनी त्यांच्या मित्राकडे याबबात चौकशी केली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
