उरण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी उरण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध आजारांची मोफत आरोग्य तपासणी, नेत्रचिकित्सा शिबिर, रक्तदान शिबिर,मोफत वैद्यकीय किट, रक्ततपासणी,ईसीजी, फुफ्फुसांची तपासणी,मोफत औषधोपचार तसेच गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.यात डोळे तपासणी 468 रुग्णांनी केले.त्यातील 252 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.तर माजी आमदार मनोहर भोईर यांचा 65 वा वाढदिवस असल्याने 65 जणांनी रक्तदान केले.रक्ततपासणी 117 जणांनी केली.तसेच मोफत मेडिकल किट 512 नागरिकांना वाटप करण्यात आले. स्त्री रोग तज्ञ डाॅक्टरांकडून 196 महिलांना मोफत सल्ला मिळाला.
जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे सोमवार दि.1 जून सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडलेल्या या महाआरोग्य शिबिराला शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेत तज्ञ डाॅक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन प्राप्त केले.
यावेळी खालापूर, उरण,पनवेल तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटना, ज्येष्ठ कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी आपल्या विभागातील व गावातील रुग्णांना शिबिरात आणून आरोग्य सेवेचा लाभ मिळवून दिला.यावेळी माजी आमदार मनोहर भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वासांबे रसायनीसह इतर परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
या महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पनवेल तालुकाप्रमुख महेंद्र गायकर, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उपजिल्हा संघटिका ममता पाटील तसेच युवा उपजिल्हा अधिकारी नितेश पाटील यांच्यासह मतदारसंघातील उध्दव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
