चिपळूण : (विशेष प्रतिनिधी) – शहरातील गजबजलेल्या भागात असलेल्या एका नामांकित लॉजवर एल सी बी आणि चिपळूण पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून अनैतिक देह व्यापाराच्या आरोपाखाली दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यापैकी एका महिलेवर गुन्हा दाखल झाला असून पीडित महिलेला रत्नागिरी महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ माजली आहे.
चिपळूण शहरामधील गजबजलेल्या भागात या लॉजवर महिलांचा वापर करून अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे रत्नागिरी एल सी बी पथक आणि चिपळूण पोलीस यांनी कारवाईसाठी महिला हवालदारांना सोबत घेत पथक तयार केले आणि त्या लॉजवर एक बनावट गिऱ्हाईक पाठवला. या बनावट कस्टमर ने संबंधित महिलेची भेट घेतली आणि तिने सांगितलेली रक्कम तिच्या स्वाधीन केली. त्यानंतर बनावट कस्टमरने खबर पक्की असल्याचा संदेश पोलिसांना कळवळा. तेव्हा संयुक्त पथकाने ताबडतोब छापेमारी केली. या कारवाईत मुंबईमधून आणलेली पीडित महिला रूममध्ये आढळली. तर हा व्यवसाय करणाऱ्या महिलेला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले.हा अनैतिक व्यवसाय करणारी महिला हि चिपळूणची राहणारी असून तिने मुंबईहून 30 वर्षीय महिलेला अनैतिक देह व्यापारासाठी चिपळूणमध्ये आणले होते अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली.
दरम्यान या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ माजली असून जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या चिपळूण शहरात असे अनैतिक धंदे उघडकीस येऊ लागल्यामुळे नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त होत आहे. चिपळूणचीच एक महिला अनैतिक व्यवसायासाठी मुंबईहून दुसऱ्या एका महिलेले आणते आणि राजरोस अनैतिक व्यवसाय करते या प्रकारामुळे शहरातील नागरिक चांगलेच हादरले आहेत. चिपळूण आणि एल सी बी पथकाने वेळीच हि कारवाई केल्यामुळे जनतेकडून पोलिसांवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय उघडकीस आल्यामुळे खळबळ…
