मुंबई : भारतीय जनता पक्षाने ६ एप्रिल २०२६ रोजी आपल्या स्थापनेची ४६ वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईतर्फे भाजप मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री. दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील ४६ विविध क्लासेस व ट्यूटोरियल्स येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात – Gen Next के साथ” कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश नव्या पिढीतील (Gen Next) युवकांपर्यंत पंतप्रधानांचे दूरदर्शी विचार आणि देशाच्या विकासाची संकल्पना प्रभावीपणे पोहोचवणे हा होता. या विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना मुंबईतील हजारो युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाद्वारे तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या विषयांवरील पंतप्रधानांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवण्यात आले. मुंबईतील विविध भागांमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये भाजयुमो मुंबईचे पदाधिकारी, जिल्हा, मंडळ व वॉर्ड स्तरावरील कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने प्रथमच मतदान करणारे युवक सहभागी झाले.