चिपळूण : नाथजोगी सेवा समाज यांच्या शंकरवाडी चिपळूण येथील २५-३० वर्ष प्रलंबित स्मशानभूमी-दफनभूमी संदर्भात चिपळूण नगर परिषद चे मुख्याधिकारी संजय जाधव व नगराध्यक्ष उमेश सकपाळ व उपनगराध्यक्ष सौ.रुपाली दांडेकर यांची स्थानिक नगरसेवक संदीप भिसे यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी भेट घेतली.

याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय चितळे,नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, सौ. अंजली कदम ,स्वच्छता सभापती शुभम पिसे,नगरसेविका सौ. वैशाली निमकर व चिपळूण नाथजोगी सेवा समाज चे शिष्टमंडळ पदाधिकारी, बांधव उपस्थित होते .