चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित शिशुविहार चिपळूण येथे दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विभाग प्रमुख श्रुती रानडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली.
दिवाळी हा प्रकाशाचा आनंदाचा आणि मांगल्याचा सण आहे. या उत्सवाचे औचित्य साधून शिशुविहार विभागातील विद्यार्थ्यांनी दिवाळीमध्ये साजरे होणारे विविध सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन ,बलिप्रतिपदा भाऊबीज ,तुळशीचे लग्न या सणांची माहिती विद्यार्थ्यांना कृतीतून व प्रात्यक्षिकातून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध सणांचे महत्त्व जाणून घेतले .
तसेच उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती परंपरेचेआणि सणांचे महत्त्व समजण्यास मदत झाली. दिवाळीचा आनंद, एकमेकांप्रती प्रेम, आपुलकी आणि आनंद वाटण्याचा संदेश या उत्सवातून देण्यात आला.
हा दिवाळीचा उत्सव विभाग प्रमुख श्रुती रानडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
सण-उत्सव प्रमुख सौ .गायत्री चितळे व सौ मिताली संसारे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उत्सव आनंदात आणि उत्साहात पार पडला.
परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित शिशुविहार मध्ये दिवाळी उत्सव उत्साहात साजरा…
