मंडणगड – मंडणगड पोलीस स्थानकाचे कार्यतत्परतेमुळे ऋषिकेश रत्नकांत कोळंबेकर या गतिमंद मुलास दोन दिवसात त्यांचे पालकापर्यंत पोहचवण्यात यश आले आहे.
10 ऑगस्ट 2026 रोजी दापोली नालासोपारा या एस.टी. ने हा मुलगा विनातिकट प्रवास करीत असल्याचे गाडीचे चालक व वाहक यांच्या लक्षात आल्याने दापोली आगाराचे कर्मचार्यांनी या मुलास मंडणगड पोलीस स्थानकाचे हवाली केले. ठाणे अमंलदार तेजस मोरे यांनी या मुलाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवून पोलीस स्थानकाचेवतीने त्याचे नातेवाईकांचा शोध सुरु करण्यात आला या करिता समाज माध्यमाचा वापरही करण्यात आला. व अतिशय कमी वेळेत या मुलाचे नाईवाईकांचा शोध पुर्ण झाला व नातेवाईक पोलीस स्थानकात आल्याने पोलीस स्थानकाने मुलास सुखरुप त्यांचे हवाली केले पोलीसांचे कार्यतत्परतेचे तालुक्यातून कौतूक होत आहे.