खेड : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान व स्वच्छता हीच सेवा-२०२६’ अंतर्गत खेड रेल्वे स्थानकावर विशेष स्वच्छता मोहीम भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ ऑक्टोबर रोजी उत्साहात राबविण्यात आली.
खेड रेल्वे स्थानकावर आढळणारा प्लास्टिक कचरा, बाटल्या व इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. ‘स्वच्छ खेड रेल्वे स्थानक, सुंदर खेड आणि निरोगी पर्यावरण’ या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभियानातून सामूहिक श्रमदानाद्वारे स्वच्छतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका सौ. स्वप्नाली चव्हाण, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष मनोज गायकवाड, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तथा भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश बामणे, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संदेश भुवड, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्ष सौ. उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा सौ. आशा सनगरे, भाजपा ओबीसी महिला मोर्चा खेड शहर चिटणीस सौ. अक्षया दांडेकर, सौ. संजीवनी शेलार, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय तोडकरी, विनायक शिरगावकर, शशांक सिनकर, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल खेड तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, भाजपा खेड शहर शक्तिकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड शहर चिटणीस राकेश चव्हाण, भाजपा खेड शहर चिटणीस अमित खेडेकर, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, भाजपा भटके-विमुक्त जाती-जमाती खेड तालुका संयोजक साईराज पवार, मिलिंद शिंदे, आनंद खेडेकर, ओंकार पाटणे, रत्नदीप जाडकर यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले.
