खेड :- येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक व इतिहास नागरिकशास्त्र विषयाचे शिक्षक श्री. संतोष तुकाराम भोसले यांना रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन (RTO) (कार्यक्षेत्र भारत) दापोली यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यस्तरीय आदर्श शिक्षक विद्यारत्न पुरस्कार -2026 प्राप्त झाला आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन (RTO) मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेले शिक्षक, मुख्याध्यापक व शैक्षणिक संस्था यांना पुरस्कारांचे वितरण केले जाते. प्रशालेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक व इतिहास नागरिकशास्त्र विषयाचे शिक्षक श्री. संतोष तुकाराम भोसले यांना सदर पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत व महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मागील 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सतत कार्यरत राहून , शैक्षणिक प्रगतीचा ध्यास घेऊन इतिहास विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शन, नेटबॉल सारख्या खेळात राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाचे मार्गदर्शन, स्काऊट गाईड राष्ट्रीय जांबोरी सहभाग, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त स्काऊट यांना मार्गदर्शक, स्काऊट राज्य पुरस्कार मार्गदर्शक, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. RTO दापोलीने या सर्व कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिला हे ज्ञानदीप परिवाराला अभिमानास्पद आहे.
ज्ञानदीप भडगावचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री. संतोष भोसले यांना रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक विद्यारत्न पुरस्कार-२०२६ प्राप्त…
