चिपळूण : तालुक्यातील पोफळी पंचक्रोशीला काल शुक्रवारी दुपारनंतर धुवाधार पावसाने चांगलेच झोडपून काढले . त्यामुळे आंबा काजू बागांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . शासनाने नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे . पोफळी पंचक्रोशीत मुसळधार पाऊस कोसळत असतानाच दुपारी तीन नंतर चिपळूणमध्येही वादळीवारा वाहू लागला .