खेड(प्रतिनिधी) : – मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत एक भीषण अपघात घडला आहे… मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसचा हा अपघात झाला असून, या दुर्घटनेत दोन प्रवासी जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे… तर सुमारे ३८ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ९ ते १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर येत आहे…
प्राथमिक माहितीनुसार, खिंडीतून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला… अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता… स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची अधिक माहिती आणि नेमकं कारण अद्याप समोर येणं बाकी आहे…