जळगाव : सध्या राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांची मागणी वाढली आहे. शेतकरी युरिया किंवा डीएपी सारख्या खतांना प्राधान्य देतात पण कृषी सेवा केंद्रांकडून खतांसाठी महागडी औषधं घेण्याची सक्ती केली जात आहे.

आधीच खतांच्या किमती २५ ते ८५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्यात हा औषधांचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे.

सरकारने या गंभीर विषयात तात्काळ हस्तक्षेप करावा, ज्या कंपन्या स्वतःच्या औषधांचा खप वाढण्यासाठी शेतकऱ्यांना हा त्रास देत आहे. त्यांच्यावर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.