दापोली : युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व प्रशिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्यासाठी जेसीआय दापोली आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (डीबीएसकेकेव्ही), दापोली यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला.

या कराराअंतर्गत व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, नेतृत्व प्रशिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) उपक्रम, युवक सक्षमीकरण, समाजसेवा प्रकल्प, विविध सामाजिक विकास उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित होण्यास मदत होणार आहे.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, डॉ. विनायक जालगावकर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, डॉ. राणे, डॉ. ठोकळ, डॉ. धांडे तसेच डॉ. त्रिपाठी उपस्थित होते. या उपक्रमासाठी विद्यापीठ प्रशासन आणि प्राध्यापकवर्गाने दिलेल्या सहकार्याबद्दल जेसीआय दापोलीतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.