मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन मुंबईतील वाय. बी. सेंटर येथे उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. २०२९ च्या निवडणुकांसाठी पक्ष अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पक्ष सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकरी, युवक, युवती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर येत्या काळात पक्ष अधिक आक्रमकपणे काम करणार आहे.असे शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, दारू आणि अंमली पदार्थांमुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. याविरोधात वेळेत पावले उचलली नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका पक्ष घेईल. राज्यात सध्या कायदा व सुव्यवस्था कुठेही दिसत नाही आहे,मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे.