दुबई : इस्रायलने लेबनॉनमधील हल्ले सुरूच ठेवल्याने इराणने रविवारी रात्री उशिरा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही इराणवर हल्ले केले. इराणवरील लष्करी कारवाईला १०० दिवस पूर्ण होत असताना दोन देशांकडून परस्पर हल्ले सुरू झाल्यामुळे त्याचे पडसाद जगभर उमटले.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आणि इस्रायल हल्ले करणार नाही अशी हमी दिली. इराणनेही सोमवारी इस्रायलवरील हल्ले थांबविल्याची घोषणा केली. मात्र, लेबनॉनवरील हल्ले सुरूच ठेवल्यास पुन्हा इस्रायलला लक्ष्य करू, अशी धमकीही दिली. इस्रायलने इराणवर अधिक तीव्र हल्ले चढवण्याची तयारी सुरू केली होती. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी तो बेत गुंडाळल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले.

इस्रायल आणि इराणमधील परस्परहल्ल्यांच्या दरम्यान येमेनमधील हुती बंडखोरांनीही सोमवारी इस्रायलवर हल्ले केले आणि लाल समुद्रामधील इस्रायलच्या नौकांना लक्ष्य