राजापूर : राजकारण हे केवळ सत्तेचा मार्ग नसून समाजसेवेचे व्रत आहे, हा विचार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नेहमीच जपला आहे. पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम उत्साहात पार पडला.
आजच्या बदलत्या राजकीय वातावरणात सत्ता आणि समाजकारण यांतील दरी वाढताना दिसते. अशा वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष समाजाच्या दुःखात सहभागी होण्याची, संवेदनशीलतेची आणि माणुसकीची परंपरा जपत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला दिलेली जनसेवेची दिशा आणि बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवलेले समाजाभिमुख विचार यांचे हे जिवंत प्रतिबिंब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, महिला तालुका संघटक प्राची शिर्के, शहर संघटक वीणा विचारे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष हातणकर, उपतालुकाप्रमुख अभिजित तेली, उमेश कोळवणकर, डॉ. आर्यन बहादुरे व डॉ. स्नेहल जुवेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच विभागप्रमुख शांताराम तळवडेकर, उपशहरप्रमुख श्रद्धा धालवलकर, सुहासिनी गुरव, विभाग संघटक स्नेहा उगले, मीनाक्षी गुरव, संगीता चव्हाण, अक्षता पाटणकर, नगरसेविका नेहा तानवडे, नगरसेविका नलिनी शेलार, माजी नगरसेवक अनिल कुडाळी, अभय मेळेकर, युवासेना तालुकाप्रमुख सुभाष नवाळे, युवती सेना शहरप्रमुख प्रतीक्षा मांजरेकर, युवती सेना उपशहरप्रमुख गार्गी चिपटे, उपविभागप्रमुख गणेश गिरकर, बाळू हर्याण, सुभाष पावणाक, प्रकाश डुकळे, चित्रा तांबे, संतोषी मासये, शांताराम पोटले, संजय पेडणेकर, मुकेश विचारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
रुग्णांना फळांचे वाटप करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. उपस्थितांनी रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवस साजरा करण्याचा हा संवेदनशील आणि समाजाभिमुख उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.
आज महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा केवळ विरोधी पक्ष म्हणून नव्हे, तर संविधानिक मूल्ये, लोकशाही, मराठी अस्मिता, सामाजिक न्याय आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारी विचारधारा म्हणून उभी आहे. राजकीय संघर्ष सुरू असतानाही समाजसेवा, जनसंपर्क आणि माणुसकीची परंपरा अखंड ठेवण्याचा पक्षाचा निर्धार अशा उपक्रमांतून अधिक दृढ होत असल्याचे या कार्यक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले
