लोटे :- ( ज्ञानेश्वर रोकडे ) लेखक इक्बाल शर्फ मुकादम लिखित ‘ती माणसं गेली कुठे?’ या गाजलेल्या मराठी पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी तमिळ संगम सभागृह, सेक्टर -९,वाशी, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ज्येष्ठ पत्रकार व प्रकाशक राजेंद्रप्रसाद मसुरेकर यांनी केला असून, या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक रफिक दलवाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बना फाऊंडेशनच्या वतीने कला, संगीत आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमास साहित्यप्रेमी, वाचक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.