मंडणगड : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, चिपळूण झोन क्र. ४० अंतर्गत देव्हारे शाखेच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, देव्हारे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन ब्रह्मज्ञान प्रचारक तथा झोन चिपळूण प्रचारक मिलिंद कासार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, माजी सभापती दौलत पोस्टूरे, ग्रुप ग्रामपंचायत देव्हारेचे उपसरपंच तुषार करावडे, क्रीडाप्रेमी विजय जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संत निरंकारी सत्संग भवन देव्हारेचे मुखी बाळाराम बैकर, सेवादल संचालक अमित गोरीवले, सेवादल शिक्षक वैभव अबगुल, सेवादल शिक्षिका चांदणी बोबले, सदानंद शिगवण, गणपत नवाले, वसंत अबगुल, शशिकांत आग्रे, डॉ. जगदीश साळुंखे, दीपक बाईत, तुषार शिगवण आणि शरद अबगुल यांनी विशेष मेहनत घेतली.
रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, एका रक्तदात्यामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. समाजहिताच्या या उपक्रमातून रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये संत निरंकारी मिशनचे योगदान उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.