मंडणगड : सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय रुग्णालय, रत्नागिरी आणि मंडणगड शहरातील मैत्री फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला तालुक्यातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला मंडणगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, विरोधी पक्ष गटनेते विनोद जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, डॉ. अजय परदेशी, तायक्वांदो प्रशिक्षक विश्वदास लोखंडे, माजी नगरसेवक राजेश मर्चंडे, बाळकृष्ण मर्चंडे, उदय मर्चंडे, रोशनी मर्चंडे, आनंद नारकर, कमलेश शिगवण, मनोज मर्चंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
फोटो ओळ : मंडणगड येथे आयोजित रक्तदान शिबिरात तायक्वांदो प्रशिक्षक विश्वदास लोखंडे यांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्या हस्ते रक्तदाता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर समवेत दिसत आहेत.
शासकीय रुग्णालय रत्नागिरी व मैत्री फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
