चिपळूण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिपळूण पोलीस ठाण्याच्या आवारात आज वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या हस्ते यावेळी पारिजात वृक्षाचे रोपण करण्यात आले. या प्रसंगी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पो. नि. मेंगडे म्हणाले, “पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पोलीस दल म्हणून आम्ही कायदा व सुव्यवस्था सांभाळत असतानाच सामाजिक व पर्यावरणीय बांधिलकीही जपतो. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे.”

पारिजात वृक्षाला धार्मिक व आयुर्वेदिक महत्त्व असून, त्याची सुगंधी फुले रात्री बहरतात. पोलीस ठाण्याच्या परिसरात हे झाड लावल्याने परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला गेला आहे.
चिपळूण पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.