रत्नागिरी : दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ल्यावर गड संवर्धन करणाऱ्या हिंदू युवकांना तेथील मुस्लिम समाजाच्या 30-35 युवकांनी संगनमताने जीवे मारण्या च्या घटने बाबत जो पोलिस तपास चालू आहे. त्यातील काही जणांवर अजूनही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनात आणून देण्यात आले. तसेच बी एन एस 109 धारा लागू असलेल्या या गंभीर प्रकरणात आरोपींची जामिनावर सुटका झाली असून आता या प्रकरणातील सर्वच आरोपी मोकाट आहेत आणि यांच्या पासून या 2 हिंदू युवकांना तसेच त्यांच्या कुटुंबीय यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे ही जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना यावेळी 2 हिंदू युवकांना सांगितले गेले. या प्रकरणी अधीक्षकांनी दापोली पोलीस यांना तत्काळ काही निर्देश यावेळी दिले.
तसेच या भेटीत हिंदुराष्ट्र समन्वय समिती कडून चिपळूण तालुक्यातील नागावे ग्रामपंचायत हद्दीतील अवैध प्लास्टिक रिसायकल युनिट जाळीत प्रकरणी शिरगाव पोलीस स्थानका कडून चौकशी अहवालाची प्रत वारंवर पाठपुरावा करूनही देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, ही बाब अधिक्षक यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली. या प्रकरणी चौकशी करणारे सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील आणि पोलीस कर्मचारी नलावडे यांच्या असहकार्य बाबत चौकशी व्हावी, असे निवेदनाद्वारे मागणी यावेळी करण्यात आली. चिपळूण येथे 23 जुलै रोजी नीट पेपर फुटी प्रकरणाच्या बाबत आयोजित केलेल्या मोर्च्यात ‘बीवी नहीं है तो क्या, देश की मारोगे’
याचे पोस्टर झळकवण्यात आले. या देशातील राष्ट्र प्रेमी नागरिक या राष्ट्राला श्रद्धेने भारत माता संबोधतात, मग यातून करोडो भारतीयांच्या श्रद्धेचा आणि देशाचा अपमान करण्यात आला आहे. अशी पोस्टर झळकावणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन यावेळी देण्यात आले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी याबाबत तातडीने चिपळूण पोलिस अधिकारी यांच्या कडे कारवाई बाबत बोलून घेतले. या भेटीसाठी हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या वतीने जिल्हा सह संयोजक आणि महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघाचे, राज्य उपाध्यक्ष अनुराग उतेकर, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत चाळके, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष आणि गोसेवा संघ रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश गायकवाड आणि हर्णे गड संवर्धन समितीचे युवक चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर उपस्थित होते.
