चिपळूण : कला व विज्ञान महाविद्यालयात ‘आपण करूया महाराष्ट्र रेड्डी’ ए. आय.’एम. के. सि.एल.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जागरूक राहून अभ्यासात योग्य वापर करावा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विकास कदम यांचे स्वागत प्रा. तानाजी कांबळे यांच्या हस्ते करणेत आले या वेळी त्याने मार्गदर्शन केल.
सध्याच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ (Artificial Intelligence) हे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे साधन बनत आहे. विद्यार्थ्यांनी ए.आयच्या वाढत्या वापराबाबत जागरूक राहून त्याचा अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक उपक्रमांसाठी योग्य व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
एआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती समजून घेणे, अवघड संकल्पना सोप्या पद्धतीने जाणून घेणे, अभ्यासासाठी संदर्भ मिळविणे, लेखन व सादरीकरणाची कौशल्ये विकसित करणे तसेच नवीन कल्पना शोधणे शक्य आहे. त्यामुळे बदलत्या शैक्षणिक तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांनी स्वतःला जोडून घेणे आवश्यक आहे.
मात्र एआयचा वापर करताना मिळालेली माहिती तशीच स्वीकारण्याऐवजी तिची सत्यता तपासणे, स्वतःचा विचार करणे आणि अभ्यासक्रमातील ज्ञानाशी त्याची सांगड घालणे गरजेचे आहे. एआयचा वापर अभ्यासाला पूरक साधन म्हणून करावा; त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये, असा संदेशही यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रा. सुनील जावीर यांनी केले.
भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि बदलते कार्यक्षेत्र लक्षात घेता एआयचे प्राथमिक ज्ञान व त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.करयकर्मास प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित होते.
कला व विज्ञान महाविद्यालयात ‘आपण करूया महाराष्ट्र रेड्डी एआय’ उपक्रम..
