लांजा : ईठ्ठला नाटका विरोधात वारकरी संघटना व हिंदू जनजागृती समितीच्या मंडळाने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कडे निवेदन दिले व नाटक तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती.
या नंतर नाटक करणारी मंडळी आमदार किरण सामंत यांना लांजा येथे येवून भेटलीअसता नाटका संबंधित चर्चा करत असतानाच रुपेश गांगण हे आपल्या कामाबद्दल गेले होते.नाटकाची चर्चा झाली होती.रुपेश गांगण यांनी सडेतोड उत्तरे दिली.सदर नाटक हे चुकीचे दाखवले जात आहे.त्यामध्ये पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी येतात रात्र होती वारकरी संतांच्या घरी मुक्काम करतात .अशा वेळी संतच आपल्याकडे आलेले वारकरी यांना फरशी घेऊन खून करतात व धन लुबाडतात.व एवढे धन ठेवायचं कुठे असा प्रश्न पडतो व ढरवले जाते ईठ्ठलाच्या पायाखाली ढेवायचे असे जाहीरपणे सांगितले जाते.
शास्त्राप्रमाणे पांडुरंगाचे 58 संत होऊन गेले त्या पैकी एकाही संताने कोणालाही मारले नाही व धनदौलत लुटली नाही. व असे कोणत्याही ग्रंथात वाचण्यात आलेले नाही. असे असताना तुम्ही नाटकात असे कसे दाखवतात.
यावर आमदार किरण सांमत म्हणाले मी वारकरी यांच्या विरोधात जाणार नाही .व देवाच्या विरोधात जाणार नाही . वारकरी कधीच चुकीचे सांगणार व बोलणार नाही.तुम्ही ते नाटक या पुढे दाखवायचे नाही असे ठामपणे सामंय म्हणाले. पालकमंत्री उदय सामंत यांनीही तसेच सांगितले आहे.तुम्ही नाटकाचे नाव बदलून संत तुका,नामा,जना ही काढून टाका व देवांचे आणि संताचे वारकरी यांचे विटंबना करू नका असेठाम पणे ठणकावून सांगितले आहे.