दापोली : वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दापोली वन विभाग आणि वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर टीम, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने शिरशिंगे गावठाण मैदान येथे देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी मा. श्री विजय सूर्यवंशीसाहेब परिक्षेत्र वन अधिकारी मा.श्री. राजेंद्र पाटील साहेब पोलीस निरीक्षक मा.श्री. महेश तोरस्कर साहेब , शिरशिंगे गावचे सरपंच श्री सुरेशजी मांडवकर वनपाल दापोली श्री रामदास खोत
वनरक्षक विश्वंभर झाडे सामाजिक वनीकरण विभागातील वनरक्षक
उपस्थित होते. तसेच वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर संस्थेचे अध्यक्ष श्री.मिलिंद गोरीवले उपाध्यक्ष श्री.मनीत बाईत सचिव श्री तुषार महाडिक व सदस्य प्रतीक बाईत, वैभव बाईत, गुंजन गोरीवले, साईनाथ कात्रे त्याचं बरोबर शिरशिंगे- नवशी गावातील ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. देशी वृक्ष हे स्थानिक जैवविविधतेचे महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्यामुळे पक्षी, फुलपाखरे, कीटक आणि विविध वन्यप्राण्यांना अन्न, निवारा व सुरक्षित अधिवास उपलब्ध होण्यास मदत होते. वन्यजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, वृक्षलागवड करून लावलेल्या झाडांचे संगोपन करावे आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. केवळ वृक्षलागवड न करता त्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
दापोली वन विभाग आणि वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर टीम, दापोली यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले. “देशी वृक्षांचे संवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि निसर्गाचा समतोल राखणे हाच समृद्ध भविष्याचा मार्ग आहे,” हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा — हरित आणि समृद्ध भविष्य घडवा!
वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त शिरशिंगे गावठाण मैदान येथे देशी वृक्षलागवड…दापोली वन विभाग आणि वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर टीम, दापोली यांचा संयुक्त उपक्रम
